scorecardresearch

अनधिकृत कारखान्यांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गाला आगीचा धोका

अग्नीसुरक्षेचे कोणतेही नियम येथे पाळले जात नाहीत. त्यामुळे महामार्गाला आगीचा धोका निर्माण झाला आहे.

विनापरवाना दुकानांत अग्नीसुरक्षेचे नियमही धाब्यावर, पालिकेकडून कारवाई नाहीच

विरार : वसई विरारजवळील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठय़ा प्रमाणात भंगारची दुकाने, फ्रिज, एसी तयार करणारे कारखाने आहेत. अग्नीसुरक्षेचे कोणतेही नियम येथे पाळले जात नाहीत. त्यामुळे महामार्गाला आगीचा धोका निर्माण झाला आहे.

वसई विरार महापालिका क्षेत्रातील वसई पूर्वेला महामागार्वर अतिक्रमण झाले आहे. त्यात प्रामुख्याने भंगारचे कारखाने आहेत. मागील वर्षभरापासून या परिसरात १०० हून अधिक छोटय़ा-मोठय़ा आगीच्या घटना समोर आल्या आहेत.  धुमाळ नगर परिसरात सुमारे २०० अनधिकृत भंगार कारखाने आहेत. त्यांच्याकडे कोणतेही परवाने, परवानग्या नाहीत, नोंदणीही नाही.  तसेच अग्निशमन विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’सुद्धा नाही. मागील दहा वर्षांत पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून कोणतेही लेखापरीक्षण झालेले नाही. दाटीवाटीने वसलेल्या या कारखान्यांत ज्वलनशील पदार्थाचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो.  या परिसरात भंगारमध्ये जुने फ्रिज, वािशग मशीन, एसी विकत घेऊन त्याची दुरुस्ती करून पुन्हा विकले जातात. त्याचप्रमाणे पुठ्ठे आणि इतर मोठे स्टील आणि बिफगचे कारखाने आहेत.  कायदेशीर परवानगीविना हे कारखाने वेिल्डग, ब्लािस्टग आणि आगीच्या संपर्कातील विविध कामे करतात. आग रोखण्यासाठी किंवा विझवण्यासाठी कोणतीही सुरक्षात्मक यंत्रणा नाही. 

धुमाळ नगर, नवजीवन, सातिवली, फादर वाडी, वालीव या परिसरात मोठय़ा प्रमाणात असे कारखाने उभे राहत आहेत. काही कारखाने रसायनांचेही आहेत.  पालिकेने या कारखान्यांना नियमाप्रमाणे नोटिसा बजावलेल्या आहेत. या नोटिसांमध्ये या कारखान्यांना अग्निशमन यंत्रणा आणि लेखापरीक्षण करण्याचे सांगितले आहे. पण या नोटिसांचे पुढे काय होते, हे कोणीच सांगू शकत नाही. नोटिसांमधील मुद्दय़ांची पूर्तता न झाल्यास पालिका काहीच कारवाई करत नाही. त्यामुळे कारखानदार या नोटिसांना सर्रास केराची टोपली दाखवतात.

पालिकेकडून कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अटींची पूर्तता न करणाऱ्या कारखान्यांवर लवकरच कारवाई केली जाईल. पालिकेकडून पाहणी करून परवानेधारकांना अग्निशमन सुरक्षासक्ती आणि इतर अनधिकृत कारखान्यांवर कारवाई केली जाईल.

आशीष पाटील, अतिरिक्त आयुक्त

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fire risk on mumbai ahmedabad highway due to unauthorized factories zws

ताज्या बातम्या