एका महिलेच्या तक्रारीवरून ९ महिने  तुरुंगात

सुहास बिऱ्हाडे

PSI Sanjay Sonawane, nagpur,
पीएसआय संजय सोनवणे म्हणतात, “मी पोलीस आयुक्तांना ओळखत नाही,” नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

वसई: वसई-विरार शहरात अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून काम करणारा तोतया शल्यविशारद हेमंत पाटील अद्याप फरार असून त्याचे आणखी प्रताप समोर आले आहेत. त्याने आतापर्यंत डॉक्टर असल्याचे भासवत पाच उच्चशिक्षितांशी लग्ने केली असल्याचे उघड झाले आहे. त्याचे खरे रूप कळल्यावर त्यापैकी एका महिलेने तक्रार दिल्यानंतर त्याने ९ महिने तुरुंगात घालवले होते. वसईत अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून तीन वर्षे दवाखाना चालविणाऱ्या हेमंत पाटील या तोतया डॉक्टरचे बिंग ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणल्यानंतर त्याच्यावर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे.   मसाला विक्री करणारा थेट एमबीबीएसनंतर पदव्युत्तर पदवी घेऊन अस्थिरोगतज्ज्ञ बनला आणि रुग्णांवर शस्त्रक्रिया करत होता. त्याने फसवणूक करुन  लग्न केलेल्यांमध्ये  एक महिला पुण्याची असून ती राज्य शासनाच्या सेवेत क्लास वन (वर्ग-१) अधिकारी आहे. ठाण्यात राहणारी महिला एमटेक असून त्यांनी गोरेगाव येथील आर्य समाजात लग्न केले होते. हुबळी येथील महिला पीएचडी पदवीधारक आहे. अमरावती येथील महिला डॉक्टर आहे. तर नुकतेच त्याने वसईत उपचारासाठी आलेल्या तरुणीला फूस लावून लग्न केले आहे. त्यामुळे आतापर्यंत त्याने पाच लग्ने केल्याचे समोर आले आहे.

अमरावतीमध्ये दंतचिकित्सक असलेल्या डॉक्टर महिलेला फसवून हेमंत पाटील याने लग्न केले होते. लग्नानंतर तिची आर्थिक फसवणूकदेखील केली होती. ज्या वेळी त्या महिलेला हेमंत पाटीलचे खरे रूप कळले तेव्हा तिने याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात हेमंत पाटील विरोधात डॉक्टर असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात २०१४ मध्ये ४०६, ४२०, ४६८ तसेच ४७१ अन्वये गुन्हा दाखल होता. याप्रकरणात तो तब्बल ९ महिने तुरुंगात होता, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

अंतरिम जामीन मिळालाच कसा?

हेमंत पाटील याची तक्रार आल्यानंतर त्याला वसई पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. मात्र पालिकेची अधिकृत तक्रार नसल्याने त्याला सोडून देण्यात आले. हेमंत पाटील याच्याबद्दल सर्व माहिती असताना त्याला पोलिसांनी सहज सोडून दिल्याने पोलीस आणि पालिकेच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हापासून हेमंत पाटील फरार आहे. त्याच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र त्याने अंतरिम जामीन (अटकेला संरक्षण) मिळविल्याने त्याला अटक करता येत नसल्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले. हेमंत पाटील याचा फोन सुरू असून तो व्हॉटसअ‍ॅपवर सक्रिय आहे, हे विशेष. हेमंत पाटील याने केलेले गुन्हे पाहता त्याला अंतरिम जामीन मिळालाच कसा असा सवाल उपस्थित झाला आहे.