विरार : गणपती उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र तयारीची लगबग सुरू आहे. खरेदीसाठी बाजारपेठ गर्दीने फुलल्या आहेत. पण यावर्षीच्या गणपती उत्सवाला महागाईची झालर लागली आहे. यामुळे नागरिकांच्या आर्थिक चिंता वाढल्या आहे. त्यात गणपतीत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फुलांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. यामुळे नैसर्गिक गणपतीची सजावट महागली आहे.

करोना आटोक्यात येऊ लागल्यानंतर  जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी अजूनही आर्थिक घडी बसली नाही. त्यात पेट्रोल, डीझेल, घरगुती गस, बरोबर खाद्य तेलाच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत.  यावर्षी शासनाकडून करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने सणावरील निर्बध शिथिल करण्यात आल्याने यावर्षी नागरिकांमध्ये सणाचा उत्साह पहायला मिळत आहे. यामुळे घरोघरी गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. त्यात पर्यावरणपूरक नैसर्गिक आरास सजावटीला विशेष महत्व दिले जाते. यासाठी मोठय़ा प्रमाणत वेगवेगळ्या फुलांची मागणी होत असते.  या काळात मोठय़ा प्रमाणात फुलांची विक्री केली जाते. पण या वर्षी फुलांच्या किमती वाढल्याने सजावटी महागात पडणार आहेत.  दीड दिवसांचे आणि पाच दिवसांच्या गणपतीची संख्या वाढल्याने फुलांची मागणी वाढली आहे. गणपतीच्या सजावटीसाठी झेंडू, मोगरा, गुलाब, शेवंती, याच बरोबर परदेशी आर्केड,जरबेरा, कार्नेशियन, जीडाली, डेझी अशा फुलांची मागणी सुद्धा वाढली आहे. पण मागील दोन वर्षांच्या कोरना काळानंतर बाजार खुलले असल्याने ही फुले बाजारात उपलब्ध होत आहेत. पण त्यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. थर्माकोल आणि पीओपीच्या सजावटी पेक्षा नैसर्गिक सजावटीकडे नागरिकांचा कल असल्याने फुलांच्या किमती वाढल्या असल्या तरी मागणी होत आहे.

मागील दोन वर्षांपासून फुलविक्रेते मोठय़ा आर्थिक संकटात सापडले होते. यावर्षी काही दिलासा मिळाला आहे. त्यात वाहतुकीचा, मजुरीचा खर्च वाढला असल्याने फुलांच्या किंमती वाढल्या आहेत.

गणेश पाटील, फुलविक्रेते, विरार

फुलांचे भाव

  •  झेंडू   : ८० ते १०० रु.किलो
  • गुलाब   २०० ते २२५ रुपये.

    – २०ची जुडी

  •  शेवंती  : १५० ते १८० रुपये      किलो
  • मोगरा : ९० ते १२० किलो
  • डेझी : ३० ते ५० रुपये जुडी
  • अस्टर : ३० ते ४०

    – १० फुलांची जुडी

  •  कार्नेशियन : १६० ते १८०     रुपये १० फुले
  •  जीडाली : ११० ते १२० रुपये      १० फुले
  • आर्केड  : ९०० ते १०००      रुपये :१० फुले
  • जरबेरा : ८० -१०० रु.१० फुले