वसई : वसई-विरार शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांसाठी असलेल्या प्रसाधनगृहे, पाणी आदी मूलभूत सोयी पुरविणे बंधनकार असताना त्या पुरवल्या जात नसल्याचे उघडकीस आले आहे. या सोयीसुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

पेट्रोल पंपांना परवानगी देताना अनेक नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. त्यात प्रामुख्याने नागरिकांच्या सोयीसुविधा पुरवणे अपेक्षित आहे. त्यात स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, वाहनात भरण्यासाठी मोफत हवा भरण्याचे केंद्र, पाणी पिण्याची पाणपोई यांचा समावेश असतो. .याशिवाय पेट्रोल पंप मालकाचे तसेच त्या विभागातील संबंधित कंपनीच्या विभागीय विक्री व्यवस्थापकाचे (सेल्स मॅनेजर) नाव आणि क्रमांक दर्शनी भागात लावणे बंधनकारक असते. वाहनाच्या चाकात मोफत हवा भरणे, ही सेवा पेट्रोल पंपावर पूर्णत: मोफत आहे. तरी सुद्धा अनेक ठिकाणी पैसे आकारले जातात. ही सेवा नसल्यास पेट्रोल पंपधारकाला १० हजार रुपयांचा दंड आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रथमोपचार सुविधा आवश्यक आहे. जेणेकरून अपघातातील जखमींना तात्काळ प्राथमिक उपचार केले जाऊ शकतात. प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल आणि डिझल याची गुणवत्ता तपासून बघण्याचा अधिकार असतो. जर ग्राहकाला पेट्रोलच्या गुणवत्तेविषयी काही संशय असेल तर तो त्यावर फिल्टर पेपर टेस्ट करू शकतो किंवा पेट्रोलचे प्रमाणही तपासून बघू शकतो.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
virar, violation of safety norms, global city, sewage treatment plants
विरार : खासगी सांडपाणी प्रकल्पांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन
mumbai municipal corporation clean up marshal
मुंबई: स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने ७५ हजार रुपये दंड वसूल
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

मात्र वसई विरार शहरातील पेट्रोलपंपावर या सुविधा दिल्या जात नसल्याचे समोर आले आहे. वसई तालुक्यात ४६ हून अधिक पेट्रोल पेट्रोल पंप आहेत. पण एकाही पेट्रोल पंपावर कोणताही सुविधा नाहीत. नालासोपारा पूर्वेतील  सेंटर पार्क जवळ असलेला पेट्रोल पंप हवा भरणारे यंत्रणा बंद आहे असा फलक अनेक महिन्यांपासून लावण्यात आला आहे. नालासोपारा पश्चिम येथील पेट्रोल पंपमध्ये महिला आणि पुरुषांसाठी प्रसाधनगृह नाही. वसई पूर्व गोखीवरे शक्ती ऑटो इंडियन पेट्रोल पंप वसई पेट्रोल पंपमध्ये कुठलेही हवा भरणारे केंद्र नाही.

वसई-विरार शहरातील पेट्रोल पंपावर केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दर्शनी भागात लावल्या जातात. मात्र इतर सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. काही पेट्रोल पंपांवर पंपचालक या सुविधा असल्याचा दिखावा करत असतात मात्र मुळात या सुविधा असल्याचे कागदोपत्री दाखवतात. प्रत्यक्षात त्या उपलब्ध नसतात.

बंधनकारक सुविधा

मोफत हवा भरण्याची सुविधा

  दूरध्वनी

स्वच्छ पाण्यासाठी पाणपोई

महिला आणि पुरुषांसाठी

    स्वतंत्र प्रसाधनगृह

  तक्रार पेटी

 प्रथोमपचार सुविधा