scorecardresearch

विरारमधील बिबटय़ा जेरबंद

विरार पूर्वेच्या जंगलाला लागून असलेल्या कोपर गावात मागील काही दिवसांपासून बिबटय़ाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

वसई: विरार पूर्वेच्या जंगलाला लागून असलेल्या कोपर गावात मागील काही दिवसांपासून बिबटय़ाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर वन विभागाने या भागात सापळा लावून बिबटय़ाला जेरबंद करण्यास यश मिळविले आहे.
विरार पूर्वेच्या भागात जंगलाला लागूनच कोपर गाव आहे. या भागातही मोठय़ा प्रमाणात नागरी वस्ती आहे. या भागातील नागरिकांना आठवडाभरापूर्वी काही नागरिकांना बिबटय़ाचा वावर होत दिसून आले होते. त्यानंतर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबटय़ाच्या भीतीने नागरिकांना जागरण करून पहारा द्यावा लागत होता, तर घराच्या बाहेर पडण्यासही अडचणी निर्माण होत होत्या.
तर दोन दिवसांपूर्वी या भागातील चार पाळीव श्वानांचाही फडशा या बिबटय़ाने पाडल्याचे समजताच येथील वातावरण अधिक भयभीत झाले होते. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवी वन विभागाने बिबटय़ाचा शोध घेण्यासाठी जागोजागी कॅमेरे लावले होते, तर मंगळवारी या भागात पथके तैनात करून पिंजरा लावून सापळा लावण्यात आला होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास लावण्यात पिंजऱ्यात हा बिबटय़ा अडकून पडला. अखेर या बिबटय़ाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. बिबटय़ा जेरबंद झाल्याने मागील काही दिवसांपासून भीतीच्या सावटाखाली असलेल्या कोपर गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Leopard confiscated virar in kopar village forest east virar urban settlement amy

ताज्या बातम्या