वसई: वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती एच अंतर्गत येणाऱ्या माणिकपूर परिसरातील गटारांवरील झाकणे तुटलेल्या आणि जीर्ण अवस्थेत असल्याने अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे ही तुटलेली झाकणे बदलून नवीन झाकणे बसवण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

वसई पश्चिमेत नवघर माणिकपूर परिसर आहे. हा परिसर महापालिकेच्या प्रभाग एच अंतर्गत येतो. या परिसरातील मुख्य रस्ते, पदपथांवर असणाऱ्या गटारांवर झाकणे बसविण्यात आली होती. पण, देखभाल दुरुस्तीअभावी गटारांवरील झाकणांची दुरावस्था झाली आहे. विविध ठिकाणी गटारांवरील झाकणे गायब झाली आहेत. तर काही ठिकाणी गटारांवरील झाकणे ही गंजलेल्या, तुटलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत.

वसई विरार शहरात विविध ठिकाणी देखभाल दुरुस्तीअभावी गटारांची झाकणे ही तुटलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत. तर काही गटारांवरील झाकणे नाहीशी झाली आहेत. वसई पश्चिमेतील नवघर माणिकपूर भागातही पदपथ, मुख्य रस्ते अशा विविध ठिकाणी गटारांवरील झाकणे गायब झाली आहेत. तर काही ठिकाणी गटारांवरील झाकणे ही गंजलेल्या, तुटलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत.

नवघर माणिकपूर हा परिसर हा परिसर रेल्वे स्थानक, बँका, बाजारपेठा आणि महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा असल्याने येथे नोकरदार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची यांची मोठी वर्दळ असते. पण, रहदारीच्या भागातील गटारांची झाकणे तुटल्यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. त्यामुळे ही झाकणे बदलण्यात यावीत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

तर, महापालिकेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांनी प्रभाग समिती एचमधील गटारांवरील झाकणांची पाहणी करून तुटलेली, मोडकळीस आलेली झाकणे त्वरित बदलावीत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर यांनी केली आहे.

तुटलेल्या गटारांवर लाकडाचे झाकण

वसईतील नवघर माणिकपूर प्रभागातील गटारांवरील तुटलेली झाकणे बदलण्यात न आल्यामुळे नागरिकांकडून तात्पुरता उपाय म्हणून गटारांवर लाकडाच्या फळ्या टाकून ते झाकण्यात आले आहेत