बुलढाणा : मेहकर शहरातील एका धक्कादायक घटनाक्रम मधून नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चाणाक्ष दारू विक्रेत्याला नोटाचा संशय आला आणि मग संबधीताच्या हाती दारू ऐवजी बेड्या ठोकण्यात आल्या. मेहकर तालुक्यातील या नाट्यमय घटनाक्रम प्रकरणी हॉटेल चालकासह तिघांना गजाआड करण्यात आले. घटनाक्रम लक्षात घेतला तर यात आणखी काही जणांना अटक होण्याची किंवा नकली नोटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुरुवारी, २५ जुलै रोजी रात्री मेहकर येथील अग्रवाल वाईन शॉपी येथे एक जण ५ हजार रुपये घेऊन दारू घेण्यासाठी आला. मात्र, चाणाक्ष वाईन शॉप मालकाला ५०० रुपयांच्या नोटा पाहून थोडा संशय आला. मालकाने त्यांच्या मालकीच्या अग्रवाल पेट्रोल पंपावरील नोटा मोजण्याच्या मशीन मध्ये ‘चेक’ केल्या असता नोटा नकली असल्याची धक्कादायक बाब समोर आली. याची माहिती मालकाने तात्काळ मेहकर पोलिसांना दिली. यावरून पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने दारू विक्री केंद्रात आले.

jaydeep apate arrested from kalyan
Jaydeep Apate Arrest : मोठी बातमी! शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक; पोलिसांनी कल्याणमधून घेतलं ताब्यात
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
case against three in mumbai for kidnapping tailor
मुंबई: ‘डिझाइन’चोरल्याच्या संशयावरून मारहाण, एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
A youth who came to meet a friend was beaten up in front of Yerawada Jail Pune news
येरवडा कारागृहासमोर टोळक्याची दहशत; मित्राला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला मारहाण
Accused of robbery gold bank arrested goods worth seven and a half lakhs seized
सोन्याची पेढी लुटणाऱ्या आरोपींना अटक, साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत
airport,passengers,fight for site,
धक्कादायक! वडिलांना पाय दाबायला लावले; नकार दिल्यामुळे चिडलेल्या मुलाने…
Erandwane koyta attack pune marathi news
पुणे: पोलिसांकडे तक्रार दिल्याने तरुणावर कोयत्याने वार, एरंडवणे भागातील घटना
Vasai Crime News
Vasai Crime : मालकाने पगार न दिल्याने तीन तरुणींचे अजब कृत्य, पाण्याच्या बाटलीतून लघुशंका प्यायला दिल्याचा रचला बनाव

हेही वाचा : चंद्रपूर : दोघांचा बळी घेणारा ‘तो’ वाघ अखेर जेरबंद, भयग्रस्त नागरिकांना दिलासा

पोलिसांनी लगेच दारू खरेदीला आलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करता आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली. आज, शुक्रवारी दुपारपर्यंत मेहकर पोलिसांनी ३ आरोपींना जेरबंद केले आहे. प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याचे या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दारू खरेदीसाठी मेहकर येथील अग्रवाल वाईन शॉपीवर ५ हजार रुपये घेऊन आलेल्या आरोपीचे नाव सोहम खेत्रे (रा. पिंपरी सरहद, ता.मेहकर) असे आहे. सोहम हा डोणगाव येथील जगदीश पांडव यांच्या हॉटेल मध्ये कामाला असतो. जगदीश पांडव याने त्याचा मित्र गजानन मुळे (राहणार डोणगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा) याच्याकडून पाच हजार रुपये उसने घेतले होते.

तेच पैसे हॉटेल मालक जगदीश पांडव याने आपला नोकर, सोहम खेत्रे याच्याकडे देऊन त्याला मेहकर येथून दारू आणायला पाठविले होते . त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गजानन मुळे हा असल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. हॉटेल मालक जगदीश पांडव यालाही अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : ग्रामसेवक पदाच्या परीक्षेसाठी पूर्व विदर्भातील परीक्षार्थींना थेट पश्चिम महाराष्ट्रात परीक्षा केंद्र

आरोपींची संख्या वाढणार?

दरम्यान या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण हॉटेल मालकाला ५ हजार रुपये उसने देणारा मुख्य आरोपी गजानन मुळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे ३२ गुन्हे दाखल आहेत. आपण नकली नोटा जगदीश पांडव याला देत असल्याचे त्याला माहीत होते. दरम्यान गजानन मुळे याने हे पैसे कुठून घेतले याचीही माहिती पोलिसांना दिली आहे . त्यामुळे आता चौथा आरोपी देखील गजाआड करण्यासाठी मेहकर पोलीस प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले. याघटनेमुळे मेहकर तालुक्यातील नागरीक आणि व्यावसायिकामध्ये खळबळ उडाली आहे.