वसई- कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या सुधीर सिंग या तरुणाची हत्या करून फरार झालेला मुख्य आरोपी राहुल पाल उर्फ मर्दा याला पेल्हार पोलिसांनी उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यातील जंगलातून पाठलाग करून अटक केली. मागील ३ महिन्यांपासून तो पोलिसांना चकमा देत होता.

कांदिवलीत राहणारा सुधीर सिंग (२७) हा तरुण कॉल सेंटरमध्ये काम करत होता. १२ जानेवारी २०२४ रोजी सिंग याची नालासोपारा पूर्वेकडील गौराईपाडा परिसरातील विशालपांडे नगरात हत्या करण्यात आली होती. पूर्ववैमन्यसातून ८ जणांनी त्याचे अपहरण करून नालासोपारा येथे आणले होते आणि धारदार शस्त्राने त्याची हत्या केली होती. याप्रकरणातील ३ आरोपींना मध्यवर्ती गुन्हे शाखेने तर २ आरोपींना गुन्हे शाखा २ च्या पथकाने अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी राहुल पाल उर्फ मर्दा हा फरार होता.

vasai, drunkard husband marathi news, bomb blast dadar marathi news
बायकोला धडा शिकविण्यासाठी अजब शक्कल, दादर आणि कल्याण स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
vasai virar municipality, development plan, problems, funds, reservation land city, 2021 to 2041, announce, survey, geographical standard, may 2024, challenges, marathi news, maharashtra,
वसई : शहराची नव्याने रचना करताना..
MLA Nilesh Lanke resign
निलेश लंकेंनी लोकसभेसाठी अखेर राजीनामा दिला; भावूक होत म्हणाले, “पवार साहेबांना त्रास दिला…”

हेही वाचा – उमेदवारीसाठी वसंत मोरेंची वणवण

आरोपीच्या शोधासाठी पेल्हार पोलिसांनी विविध पथके तयार केली होती. दरम्यान, राहुल पाल हा उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथके रवाना झाली. मात्र तेथूनही तो निसटला होता. दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून तपास केला असता तो जौनपूर जिल्ह्यातील सकोई येथील गावात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे पोलिसांना सापळा लावला होता. मात्र तो रात्रीच्या अंधारात सकोईमधील जंगलात पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे आणि त्यांच्या ४ जणांच्या सहकार्‍यांनी त्या घनदाट जंगलात पाठलाग करून पाल याच्या मुसक्या आवळल्या. त्याला नालासोपारा येथे आणण्यात आले असून २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील आदींना यी प्रकरणाचा तपास केला आहे.

हेही वाचा – अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा

या प्रकरणात सुरज चव्हाण (२५), अखिलेश सिंग (२७) साहिल विश्वकर्मा (२१) , विशाल पांडे (२५) विकास पांडे (२४) आणि सुरेंद्र पाल (२७) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर दोन फरार फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

बायकोला फोन केला आणि पोलिसांना सुगावा लागला..

राहुल पाल याने पोलिसांना चकमा देण्यासाठी आपली ओळख लपवली होती. तो मोबाईल फोन देखील वापरत नव्हता. भदोई जिल्ह्यात त्याची बायको राहते. त्याच्या बायकोला त्याने एकदा फोन केला होता. तिच्या मोबाईलच्या सीडीआर (कॉल्सचे तपशील) पोलिसांनी त्या क्रमांकाचा शोध लावाला आणि त्याचा माग काढला.