भाईंदर :- लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला होता. पाहुण्यांची लगबग सुरू होती. वर लग्नामंडपात वधूची वाट बघत बसला होता. लग्नघटिका जवळ येऊ लागली आणि वधू विवाहस्थळी पोहोचण्यासाठी निघाली.पण उदवाहनात असताना अचानक उदवहन बंद पडली. सगळ्यांचा जीव टांगणीला लागला. अग्निशनम दलाच्या जवानानांना बोलावण्यात आलं आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न २० मिनिटांनंतर करून लिफ्ट मध्ये अडकलेल्या वधूला बाहेर काढलं. रात्री ८ च्या मुहूर्तापूर्वी हे बचाव कार्य यशस्वी झालं आणि वधू वराचं लग्न सुखरूप पार पडलं. सोमवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास भाईंदर येथे ही घटना घडली.

भाईंदर येथे राहणार्‍या प्रिती वागळे या तरुणीचं सोमवारी लग्न होतं. भाईंदर पश्चिमेच्या राई येथील विनायक नगर येथील सभागृहात लग्न सोहळा सुरू होता. रात्री ९ चा मुहूर्त होता. सगळे जण वधूची वाट बघत होते. तयारी करून रात्री सव्वा आठच्या सुमारास नवरी मुलगी आपल्या तीन बहिणी आणि दोन लहान बाळासोबत तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी निघाली. मात्र अचानक उदवाहिका बंद पडली. ऐनवेळी उदवाहिका बंद पडल्याने मोठा बाका प्रसंग उद्भवला. उदवहनात अडकल्याचे संकट एकीकडे तर दुसरीकडे लग्नाचा मुहूर्त चुकण्याची भीती. कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला. या प्रसंगाची माहिती अग्निशमन दलाा मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारीही पोहोचेले. २० मिनिटांच्या प्रयत्नानंतर उदवहनात अडकलेल्या वधूसह इतरांची सुटका कऱण्यात आली आणि तिचे लग्न सुखरूप पार पडले. उदवहनातील अडकलेल्या इथर महिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आम्हाला घटनेची माहिती मिळताच उदवहनात अडकलेल्या महिलांची सुखरूप सुटका केली अशी माहिती अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली आहे.

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल