वसई- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसईमधील प्रतिष्ठित ख्रिस्ती नागरिकांची मातोश्रीवर भेट घेतली. यामध्ये धर्मगुरू, साहित्यिक आदी प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश होता. मतदारसंघाची समस्या आणि इतर महत्वपूर्ण विषयांवर ठाकरे यांनी चर्चा केली.

वसई विरार शहरात ख्रिस्ती मतदारांची संख्या मोठी आहे. ख्रिस्ती मते निकालात निर्णयाक ठरत असतात. भाजपाच्या जहाल हिंदुत्ववादी भूमिकेमुळे ख्रिस्ती मतदार भाजपापासून दुरावले आहेत. या ख्रिस्ती मतदारांना आपलेसे करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा एक भाग म्हणून शुक्रवारी वसईतील प्रतिष्ठित ख्रिस्ती नागरिकांनी ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर भेट घेऊन चर्चा केली. त्यामध्ये कवी सायमन मार्टिन, फादर ज्यो आल्मेडा, फादर मायकल तुस्कानो, शिलू परेरा, जॉर्ज डाबरे, बबन लोपीस, संजय गुरव, प्रथमेश राऊत आणि किशोर पाटील यांनी सहभाग घेतला. संपर्क प्रमुख आमदार सुनिल शिंदे आणि जिल्हाध्यक्ष पंकज देशमुख यांनी या भेटीचे आयोजन केले होते.

Congress, Vanchit, Muslims, Akola,
अकोल्यात मुस्लिमांच्या मतांवर काँग्रेस व वंचितचा डोळा
MNS workers are active in the campaign of Sunetra Pawar In Baramati
बारामतीत मनसेचे कार्यकर्ते सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रीय
Chhagan Bhujbal Hemant Godse and other Political leaders gather in Kalaram temple
नाशिक : काळाराम मंदिरात राजकीय नेत्यांची लगबग
Pankaja Munde, Pankaja Munde campaign rally,
पंकजा मुंडेंच्या प्रचार मेळाव्यात पक्षांतर्गत गटबाजीचे दर्शन, आमदार मुंदडा अनुपस्थित

हेही वाचा – उदयनराजेंच्या उमेदवारीच्या प्रतीक्षेने साताऱ्यात कार्यकर्ते आक्रमक, भाजपा जिल्हाध्यक्षांनाच घातला घेराव

हेही वाचा – अजित पवारांचे बंधू सुप्रिया सुळेंच्या प्रचारात, श्रीनिवास पवार यांच्याकडे इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी

वसईतील ख्रिस्ती नागरिकांच्या समस्या, स्थानिक प्रश्न, २९ गावांचा प्रश्न आदींबाबत ठाकरे यांनी चर्चा केली. ख्रिस्ती समाजाच्या अपेक्षाही ठाकरे यांनी जाणून घेतल्या. ही भेट औपचारिक होती. ठाकरे यांनी ख्रिस्ती समाजाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. वसईच्या स्थानिक प्रश्नांवर जनतेच्या बाजून कायम असल्याचे सांगितल्याची माहिती कवी सायमन मार्टीन यांनी दिली.