गुहसंकुलांना रहिवाशांची माहिती देण्याचे आवाहन
विरार : वसई विरार महानगरपालिकेतर्फे अखेर गृहसंकुलांत लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी गुहसंकुलांना रहिवाशांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मागील अनेक महिन्यांपासून ही मागणी गेली जात होती. अखेर पालिकेने यासंदर्भात निर्णय घेत नागरिकांना दिलासा दिला आहे. वसई-विरार महानगरपालिकेने लसीकरण मोहीम जलद गतीने राबविणे यावर भर दिला असून ७० टक्क्यांचे पालिकेकडे लसीकरण केले आहे. त्यात अनेकांना लसीकरण केंद्रावर जाता येत नाही. अथवा गर्दीचा सामना करवा लागतो. यामुळे आता लसीकरण तुमच्या दारी असा पवित्रा पालिकेने घेतला आहे. यासाठी पालिकेने गृहसंकुलांना आवाहन केले आहे की गृहसंकुलातील नागरिकांची माहिती देण्यात यावी. यात पहिली मात्रा आणि दुसरी मात्रा तसेच वयोगट नमूद करण्याचे सांगितले आहे. सदरची माहिती ही नजीकच्या लसीकरण केंद्रात जमा करावी त्यानुसार गृहसंकुलातात लसीकरण केले जाईल, असे पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले आहे.
महानगरपालिका वैद्यकीय विभागाचे लसीकरण विभागाचे डॉ. धनंजय विश्वकर्मा यांनी माहिती दिली की, पालिकेने लवकरात लवकर शहरातील नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे. यामुळे आता पालिका सरळ गृहसंकुलात जावून लसीकरण करणार आहे. यासाठी डॉक्टर आणि परिचारिकांचे पथक तयार करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केद्रावरील माहिती नुसार गुहसंकुलात लसीकरण करण्यात येयील तरी नागरिकांनी आपल्या गृहसंकुलातील माहिती नजीकच्या आरोग्य केंद्रात तातडीने जमा करावी आणि पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.