वसई: वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर करवाढ न करणारा अर्थसंकल्प सादर करून प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र, त्याचवेळी उत्पन्नवाढीसाठी नवीन मार्ग शोधण्याचे आव्हानही प्रशासनासमोर आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्या मालमत्तांवर आजतागायत करआकारणी झाली नाही, अशा मालमत्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर कर आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई-विरार महापालिकेला मागील वर्षी मालमत्ता करातून ३०६ कोटी ८ लाख इतके उत्पन्न मिळाले होते. आगदी आर्थिक वर्षांत पालिकेने ३३६ कोटी ५४ लाख मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. त्याअंतर्गत शहरातील नव्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना कर आकारण्यात येणार आहे. त्यासोबत पालिकेकडे नोंद करण्यात आलेल्या ७१७ मोबाइल मनोऱ्यांच्या चालकांकडूनही कर वसूल केला जाणार आहे.  वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात नव्याने उभ्या राहणाच्या इमारतींना ना हरकत देताना आकारले जाणारे विशेष अग्निसंरक्षण शुल्क  आणि विशेष अग्निशमन उपकर यातून सन २०२२-२३ मध्ये ६ कोटीने  वाढ करत यावर्षी  ३० कोटी ०५ लाख इतका निधी अपेक्षित असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. याखेरीज पालिकेच्या जाहिरातधोरणानुसार मिळणाऱ्या निधीत यंदा आणखी वाढ होऊन तो सहा कोटी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीपासून पालिकेने शहरात स्वच्छता कर आकारणी सुरू केली असून त्यातून आगामी आर्थिक वर्षांत ३३ कोटींचे उत्पन्न गृहीत धरले आहे. 

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar municipal corporation budget 2022 property tax in vasai virar zws
First published on: 17-03-2022 at 00:53 IST