वसई : सूर्या पाणी प्रकल्पातून वसई- विरार महापालिकेला १८५ दशलक्ष लिटर पाणी मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याने पालिकेने थांबवलेली नळजोडणी प्रक्रिया सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्षांचा मालमत्ता कर भरल्यानंतर अर्जदारांची प्रतीक्षायादी तयार करून नळजोडणी देण्यास सुरुवात केली जाणार आहे. नळजोडणी नसल्याने टँकरच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या वसईकरांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

वसई विरार महापालिका क्षेत्रास सूर्या, उसगाव पेल्हार या पाणीपुरवठा योजनेतून २०१७ पूर्वी केवळ १३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत होता. २०१८ नंतर महापालिकेला सूर्या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत १०० दशलक्ष लिटर्स अधिक पाणीपुरवठा सुरू झाला. शहराचा एकूण पाणीपुरवठा २३० दशलक्ष लिटर्सवर गेला. त्यामुळे महापालिकेने १९ डिसेंबर २०१८ रोजी महासभेत मागेल त्याला नळ जोडणीचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. या निर्णयामुळे इतकी वर्षे पाण्यापासून वंचित राहिलेल्या अनधिकृत इमारतींनाही नळजोडण्या देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. २०१९ मध्ये १० हजाराहून अधिक अर्ज महापालिकेला प्राप्त झाले. त्यातील ६ हजार ०५६ जोडण्या दिल्या होत्त्या. मात्र नंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नळजोडण्याचे काम थांबले होते.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

दरम्यान, लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आणि वितरण व्यवस्था नसल्यामुळे पाणी देणे अशक्य झाले. शहराला सूर्या टप्पा, उसगाव आणि पेल्हार मिळून २३० दशलक्ष पाणी मिळू लागले. पण शहरातील लोकसंख्या पाहता ३३८ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत मिळणाऱ्या २३० दशलक्ष लिटर्स पाण्यातून ३५ टक्क्याची चोरी व गळती वजा जाता साधारण १५० ते १८० एमएलडी पाणी मिळत आहे. त्यामुळे पालिकेकडून एक दिवसाआड पाणी पुरवठा जाऊ लागला. पाण्याची मागणी वाढल्याने आणि वितरण व्यवस्था नसल्याने नवीन नळजोडण्या थांबविण्यात आल्या. तीन वर्षांपासून पालिकेने एकही नळजोडणी न दिल्याने नागरिकांना नाईलाजाने टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

आता वसईला सूर्या प्रकल्पातून अतिरिक्त १८५ दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. त्याच्या वितरण व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेने स्थगित केलेली नळजोडणी प्रक्रिया पुन्हा सुरू कऱण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी आधी अर्ज केले आहेत त्यांना नळजोडण्या प्राधान्यक्रमाने दिल्या जातील.

२३०० अर्ज प्रलंबित

वसई विरार शहराच्या अनेक वसाहतींना तर केवळ टँकरच्या पाण्याचा आधार आहे. पालिकेने २०१७ पर्यंत ३४ हजार ३०२ घरगुती , ९९६ व्यावसायिक, २२८ औद्योगिक २२८, १५० शाळा १८७ मंदिर आणि धर्मशाळा तर १ हजार १९० नळ जोडण्या दिल्या होत्या तर २०१७ नंतर १४ हजार ९९२ जोडण्या दिल्या होत्या. २०२० पासून पालिकेने नवीन नळजोडण्या देण्याची प्रक्रिया थांबवली होती. जवळपास २३०० अर्ज नवीन जोडणी साठी मागील ३ वर्षांभरापासून प्रलंबित आहेत.