वसई तालुक्यातील खानिवडे येथील तानसा खाडीत पाय घसरून महिला बुडल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली असून शीलादेवी ठाकूर (४०) या महिलेचे नाव आहे. अग्निशमन दलाकडून या महिलेचा शोध सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी सुमारे साडेचारच्या सुमारास शिलादेवी रवींद्र ठाकूर (४०) ही महिला आपल्या दोन मुलींसह  हेदवडे येथे फेरफटका मारण्यासाठी गेली होती.

हेही वाचा >>> विरारमध्ये सोसायटीच्या आवारात दुर्घटना, गाडीच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू

या रस्त्याच्या बाजूलाच तानसा खाडी आहे . तेथील खाडीच्या किनाऱ्यावर ती उतरली होती. त्यावेळी तिचा पाय घसरून पाण्यात पडली. यावेळी खाडीला आलेल्या मोठ्या भारतीच्या प्रवाहात वाहून गेली आहे. या घटनेची माहिती मांडवी पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दलाच्या मदतीने शोधकार्य सुरू केले आहे अशी माहिती मांडवी पोलिसांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.