वसई : दुचाकीवरून मित्रासोबत महाविद्यालयात जाणार्‍या २३ वर्षीय तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी मिरा रोडच्या मेडतिया नगर येथे ही घटना घडली. दुचाकी भरधाव वेगाने जात असताना तिच्या मित्राने अचानक ब्रेक मारल्याने दुचाकी पलटी झाली आणि हा अपघात घडला.

फोरम शहा (२३) ही तरूणी बोरीवलीत राहते तर तिचा मित्र हर्ष शहा हा भाईंदर येथे राहतो. दोघे मिरा रोड येथील एका महाविद्यालयात शिकत होते. सध्या परिक्षा असल्याने फोरम हर्षच्या घरी आली होती. दुपारी ते दोघे महाविद्यालयात जाण्यासाठी निघाले. हर्षच्या दुचाकीवर ( ॲक्टीवा एमएच ०४ एचसी ०९६१) फोरम मागे बसली होती.दुपारी पावणे दोनच्या सुमारास ते मिरा रोडच्या गोल्डन नेस्ट येथील मेडतिया नगर येथून जात होते. यावेळी समोर एक बस असल्याने अचानक हर्षने दुचाकीचा ब्रेक लावला. यामुळे भरधाव वेगात असलेली दुचाकी पलटी झाली आणि मागे बसलेली फोरम रस्त्यावर फेकली गेली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र संध्याकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Pune, Kalyaninagar, truck,
कल्याणीनगरनंतर पुण्यात आणखी एक मोठा अपघात : भरधाव ट्रकने दोन महाविद्यालयीन तरुणांना चिरडले
Maharashtra 10th Results 2024
Maharashtra 10th SSC Results 2024 Declared: दोन वर्षांआधी वडील गेले, दहावीचा तिसरा पेपर असताना आईचेही निधन, डोळ्यात अश्रुच्या धारा असताना प्रत्युशने दहावीमध्ये…..
children hospital fire new born baby dies
‘बेबी केअर सेंटर’ लागलेल्या आग प्रकरणात धक्कादायक खुलासे; त्या रात्री नक्की काय घडलं?
Clerk killed in dispute between founder teacher of Siddhartha Science College in Gondia
संस्थापक-शिक्षकाच्या वादात लिपीकाची हत्या; गोंदियातील सिद्धार्थ विज्ञान महाविद्यालयातील घटना
arrest Class XI student elopes with her father friend in Nagpur
अकरावीच्या विद्यार्थिनीचे वडिलांच्या मित्रासोबत पलायन; अपहरणकर्त्याला गोंदियातून अटक
A young man died in a two wheeler accident mumbai
दुचाकीच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
Solapur crime news, professor dance in dance bar
डान्सबारमध्ये नाचणाऱ्या प्राध्यापकाचा दोन लाखांच्या खंडणीसाठी छळ, पाचजणांच्या टोळक्याविरूध्द गुन्हा दाखल
Rohit Vemula suicide case closed
“रोहित वेमुला दलित नव्हता”, पोलिसांनी केली फाईल बंद, सर्व आरोपींना क्लीन चीट

हेही वाचा…वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना

दुचाकी भरधाव वेगात असल्याने नियंत्रण सुटले आणि बसला पाहून त्याने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात घडल्याचे नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले. दुचाकी चालक हर्ष शहा याच्या विरोधात आम्ही कलम २७९, ३०४ अ, ३३७,३३८ तसेच मोटार वाहन कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणारे नया नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश कड यांनी सांगितले.