भाईंदर :-भाईंदर मध्ये चोर असल्याच्या संशयाने केलेल्या मारहाणीत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खारी लगाव येथील औद्योगिक वसाहती येथे ही घटना घडली.याप्रकरणी चार जणांना नवघर पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 सोमवारी सायंकाळी भाईंदरच्या खारीगावातील भाजीबाजारा जवळ असलेल्या एका नाल्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत नवघर पोलीस ठाण्यात  गुन्हाची नोंद करण्यात आली होती. त्यानुसार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने शोध मोहीम राबवून पोलिसांनी अवघ्या सहा तासात चार आरोपीना मुंबई येथून पळून जात असताना ताब्यात घेतले. मात्र यातील एक जण पळून जाण्यास यशस्वी ठरला.चोरीच्या संशया वरून बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाला असल्याची कबुली आरोपीनी दिली असल्याची माहिती नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth killed on suspicion of being a thief in bhayander amy
First published on: 07-02-2024 at 23:56 IST