18 January 2019

News Flash

घर सजवताना : अँथ्रोपॉमेट्रिक डेटा

फर्निचर , स्वयंपाकाचा ओटा तसेच बाथरूममधील निरनिराळी उपकरणे यांना हे नियम जरा जास्तच लागू होतात.

गेले काही दिवस आपण फर्निचर या विषयाचा बराच ऊहापोह केला. परंतु फर्निचर आणि एकंदरीतच इंटीरियर डिझायिनगच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा, पण आपल्याला माहीत नसणारा मुद्दा आज आपण पाहणार आहोत. आजकाल इंटीरियर डिझाइन करून घेताना ‘कस्टमाइझ’ हा शब्द सतत कानावर पडतो. कस्टमाइझ म्हणजे काय तर, आपल्या आवडीनुसार किंवा सोयीनुसार एखादी वस्तू बनवून घेणे. यात बरेचदा फíनचरची मापे बदलणे विशेषत: कपाटाची अंतर्गत रचना बदलणे गोष्टींचा समावेश होतो.

हे बदल करताना जर शास्त्रशुद्धपणे केले गेले तर नक्कीच वस्तूची उपयुक्तता वाढवतील, पण त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने केलेले बदल मात्र आपली डोकेदुखी वाढवतील. फर्निचर , स्वयंपाकाचा ओटा तसेच बाथरूममधील निरनिराळी उपकरणे यांना हे नियम जरा जास्तच लागू होतात.

थोडक्यात असे की, वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींसाठी विशिष्ट मोजमापांचे प्रमाण ठरविण्यात आले आहे, जेणेकरून माणसांना वापरण्यास आणि वावरण्यास त्या वस्तू सोप्या होतील. इंटीरियर डिझायिनगच्या अभ्यासक्रमांतर्गत या मोजमापांचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. ज्याला म्हणतात अँथ्रोपॉमेट्रिक डेटा. अँथ्रोपो हा एक ग्रीक शब्द आहे. ज्याचा अर्थ होतो माणूस किंवा माणसाशी संबंधित आणि अँथ्रोपॉमेट्रिक डेटा हा एक असा विषय आहे ज्यात माणसाच्या शरीराच्या मोजमापांचा त्याच्या हालचालींचा आणि त्या अनुषंगाने लागणाऱ्या जागेचा अभ्यास केला जातो. ज्याचा उपयोग आपल्याला आपले फर्निचर बनवताना होतो. असा अभ्यास करून फíनचरची काही प्रमाण मापे ठरविली गेली आहेत. या प्रमाण मापांप्रमाणे बनवलेले फर्निचर हे सर्वसामान्य शारीरिक स्थिती असणाऱ्या सर्वाना वापरायला सोयीचे आणि सुखकर होते.

आज आपण थोडक्यात काही महत्त्वाच्या फíनचरची प्रमाण मापे पाहू या. सर्वप्रथम सोफा. घरात आल्या आल्या आरामशीर बसून दिवसभराचा थकवा घालवण्याचे पहिले ठिकाण सोफा. म्हणूनच सोफ्याला लावलेला फोम किंवा वरून लावलेल्या कापडाइतकीच महत्त्वाची त्याची योग्य अशी मोजमापे. सोफ्यावर बसताना माणसाला मागे रेलून बसता आले पाहिजे; परंतु त्याचसोबत पायाचे तळवेही पूर्णपणे जमिनीला टेकलेले हवेत. याकरता सोफ्याच्या सीटची उंची १६ इंच तर लांबी रुंदी २० इंच ते २२ इंचांपर्यंत असावी. सीटच्या वर सोफ्याची पाठ किमान १८ इंच तरी असणे गरजेचे, शिवाय सोफ्याची पाठ किमान १० अंशात मागे झुकलेली असावी. सोफ्याचे हॅन्डल सीट पासून ६ ते ७ इंचांवर असलेले बरे म्हणजे हात त्यावर ठेवल्यावर आरामदायक वाटेल.

हे झालं सोफ्याविषयी, पण घरात आणखीही काही बठकीचे प्रकार असतात जसे की, डायिनग टेबलच्या खुच्र्या, अभ्यासिकेतील खुच्र्या. या सर्व बठकांच्या मोजमापांत त्यांच्या उपयुक्ततेनुसार थोडाफार फरक पडतो. परंतु सर्व बठकीबाबत एक समान गोष्ट जी तुम्ही नेहमी लक्षात ठेवू शकता ती म्हणजे, पाय जमिनीला टेकले पाहिजेत, अर्थात यातील कोणतीही बठक वापरात असताना पायाचे तळवे जर पूर्ण जमिनीला टेकत असतील तर ती बठक आरामदायक. आता खुच्र्या बनवत असताना त्यांच्या सीटची उंची मात्र १८ इंचांपर्यंत ठेवावी व सीटची लांबी रुंदी देखील १६ इंच ७ १६ इंच किंवा १८ इंच ७ १८ इंच इतकीच असावी. खुर्चीची पाठ देखील ५ अंशांहून अधिक मागे झुकणारी नसावी.

खुर्चीबद्दल बोलल्यावर अर्थात नंबर लागतो तो टेबलचा. तर टेबल जेवणाचे असो किंवा अभ्यासाचे त्याची उंची किमान ३० इंच तर कमाल ३२ इंचांच्या वर असू नये. खुच्र्या, सोफे याच्या बरोबरीने महत्त्वाचा आणि एक घटक म्हणजे पलंग. दिवसाच्या चोवीस तासांतील महत्त्वाचे ६ ते ८ तास आपण याच्यावरच काढतो, त्यामुळे पलंग जर आरामदायक नसेल तर संपूर्ण आरोग्य धोक्यात येऊ शकते. पलंग बनवताना देखील पलंगाच्या उंचीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि जर तो पलंग वयस्कर लोकांसाठी असेल तर थोडे आणि लक्ष देण्याची गरज असते. पलंगावर बसताना गुडघ्यात पायांचा काटकोन झाला पाहिजे, शिवाय इथेही तळपाय जमिनीला टेकायलाच हवे. पलंगाच्या लांबी-रुंदीमध्ये अनेक प्रकार दिसून येतात, ज्यात सिंगल म्हणजेच एका व्यक्तीच्या वापर पुरता पलंग, डबल बेड  मग क्वीन साइझ बेड आणि किंग साइझ बेड. यात चढत्या भाजणीप्रमाणे मापे वाढत जातात. आपण मात्र एका तसेच दोन माणसांना लागणारी पुरेशी जागा किती तेवढेच आधी माहीत करून घेऊ. एका व्यक्तीला झोपायला किमान ३ फूट रुंद तर ६.२५ फूट लांब पलंग आवश्यक असतो. दोन व्यक्तींसाठी लांबी तीच राहते, पण रुंदी मात्र किमान ५.५ फूट तरी हवीच.

पलंगानंतर बेडरूममध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे कपाट. कपाट ही अशी वस्तू आहे ज्याच्या डिझाइनमध्ये सर्वात जास्त हस्तक्षेप केला जातो. कधी हँगरचा भाग खालीच घे तर कधी जास्तीचे ड्रॉव्हरच टाक. अर्थात, आपापल्या सोयीनुसार हे बदल करून घेण्यात काहीच गर नाही. पण हे बदल करत असतानाही कपाटाच्या मूळ प्रमाणबद्धतेला धोका पोहोचता कामा नये, अन्यथा सोय करता करता कधी गरसोय होईल तेही कळणार नाही. कपाट बनवत असताना शक्यतो दोन भागांत बनवावे, ७ फूट अथवा दरवाजाच्या उंचीपर्यंत एक भाग तर त्यावरील दोन फुटांसाठी वेगळा भाग. ७ फुटांपर्यंतच्या खालच्या भागात नेहमीच्या वापराच्या वस्तू तर त्यावरील भागांत सुटकेस, बॅगा. रोज न लागणाऱ्या वस्तू. सर्वसामान्य उंचीच्या माणसाचा हात ६.५ ते ७ फुटांपर्यंत सहज पोहोचतो ही गोष्ट ध्यानात घेऊन कपाटाचे हँगर शक्यतो वर लावावेत. शेल्फमध्ये काय ठेवलंय हे सहज दिसण्याच्या दृष्टीने शेल्फ नेहमीच डोळ्यांच्या उंचीला असलेले चांगले. तर ड्रॉव्हर कधीही ३.५ फुटांपेक्षा वर नसावेत जेणेकरून ड्रॉव्हरमधील वस्तू डोळ्यांनी पाहता तर येतीलच पण सोबतच सहजपणे काढता-ठेवता देखील येतील. कपाटाची उंची जितकी महत्त्वाची तितकीच त्याची खोली देखील महत्त्वाची. कपाटाची खोली किमान २१ इंच तर कमाल २६ इंच योग्य. त्यातही लहान मुलांसाठी २१ इंच तर मोठय़ा माणसांसाठी २४ ते २६ इंच हे प्रमाण असावे.

फíनचरच्या परिवारातील आणखी एक महत्त्वाचा सदस्य म्हणजे आरसा. घरातील विशेषत: बेडरूममधील तर याचे स्थान विशेष. तर आपण बेडरूममधील मोठय़ा आरशाबद्दल बोलू. आरसा आणि त्यासोबतच ड्रेसर यांची जागा अशी असावी की त्याच्यासमोर उभे राहण्यासाठी मोकळी जागा असलीच पाहिजे. आरसा जमिनीपासून १८ ते २० इंच उंचीवरून सुरू करून ७ फुटांपर्यंत त्याची वरची कड येईल अशा पद्धतीने लावावा. आरशाची रुंदी देखील किमान १६ ते १७ इंचांपासून कमाल डिझाइनप्रमाणे ठरवावी. इथे दिलेल्या मापांनुसार केलेल्या आरशात आपण आपादमस्तक आपली प्रतिमा पाहू शकतो तरीही आपल्या आवडीनुसार व डिझाइननुसार आरशाच्या लांबी-रुंदीमध्ये काही प्रमाणात बदल सहज केले जाऊ शकतात, उदा. थेट जमिनीपासून देखील आपण आरसा लावू शकतो तसेच लांबी-रुंदी उंची देखील जागा असल्यास वाढवू शकतो.

ही आपण काही महत्त्वाच्या ठळक फíनचरची मापे पहिली; परंतु एकंदरीतच जे फर्निचर वापरताना माणसाच्या शरीरावर अतिरिक्त ताण अथवा दाब येत नाही ते फर्निचर सगळ्यात उत्तम. आपण ही जी मोजमापे पाहिली ती भारतीय उपखंडातील माणसांसाठीची योग्य मोजमापे आहेत. अर्थात पाश्चिमात्य देशांतील अथवा आफ्रिकन खंडातील लोकांसाठी हीच मोजमापे थोडी वेगळी असू शकतात. याखेरीज मघाशी आपण उल्लेख पहिला ‘सर्वसामान्य शारीरिक स्थिती’ याचा अर्थ धडधाकट शरीर. समाजात आपल्याला अपंग व्यक्तीही दिसतात. जर घरात एखादी अपंग व्यक्ती असेल तर मात्र हीच वरील मोजमापे त्यांच्या सोयीनुसार बदलून त्यांना वापरण्यायोग्य फíनचरदेखील आपण बनवू शकतो.

(इंटिरियर डिझायनर)

ginteriors01@gmail.com

First Published on May 26, 2018 5:10 am

Web Title: anthropometric data