मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायटय़ा आणि इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये त्यांच्या टेरेसवर मोबाइल टॉवर्स बसवलेले आहेत. किंवा इमारतींच्या भिंतींवर जाहिरातींचे फलक लावलेले आहेत. यातून सोसायटीला चांगले उत्पन्न मिळते व त्यामुळे सभासदांकडून मेंटेनन्स चार्जेस कमी प्रमाणात गोळा करण्यात येतो.

ज्या सोसायटय़ांना मोबाइल टॉवर्स / होर्डिग्ज (फलक) लावलेले आहेत त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या, नोटिफिकेशन नं एसजीवाय / २०१४ / सीआर / एनओ. ७२ / १४- एस दिनांक ३ / ०६ / १४ च्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. नागरी विकास विभाग (अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट), मंत्रालय, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोबाइल टॉवर्स बसवण्याबाबतची धोरणे, नियम व नियमने तयार केलेली आहेत. महाराष्ट्र राज्याने प्रसिद्ध केलेल्या निर्देशांमध्ये कोणत्याही सोसायटीने मोबाइल टॉवर्स / होर्डिग्ज (फलक) लावण्यापूवीं कोणत्या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे व काय सावधगिरी बाळगली पाहिजे याबद्दल स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. सोसायटय़ांसाठी आता आर्थिक वर्ष संपत आहे. त्यामुळे त्यांना गोळा केलेले पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवणे आवश्यक आहेत.

fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर

या संदर्भात या निर्देशामध्ये सर्व गृहनिर्माण सोसायटय़ांना, सोसायटीच्या इमारतीवर मोबाइल टॉवर बसवण्यातून किंवा जाहिरातींचे फलक लावण्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची विभागणी कशी करायची याबद्दल मार्गदर्शन केलेले आहे.

मोबाइल टॉवर्स बसवण्यामुळे किंवा जाहिरातींचे फलक लावण्यामुळे मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी ५०% भाग सिंकिंग फंडात ठेवला पाहिजे आणि ही रक्कम स्वतंत्रपणे राखून ठेवली पाहिजे. उरलेली  ५०% रक्कम सभासदांमध्ये बोनसच्या स्वरूपात किंवा जनरल बॉडीमध्ये ठरवल्यानुसार वापरण्यात यावी. वर सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक करण्याखेरीज, बायलॉज क्रमांक १३ (सी)  नुसार सभासदांकडून सिंकिंग फंडसाठी पैसे गोळा करणे बंधनकारक आहे आणि अशा रीतीने वर्षभरात गोळा केलेली रक्कम फिक्सड् डिपॉझिटमध्ये गुंतवण्यात यावी व त्याला सिंकिंग फंड असे स्वतंत्रपणे नमूद करण्यात यावे. कृपया लक्षात घ्यावे की सिंकिंग फंडातील रकमेचा उपयोग करण्यासाठी सोसायटीच्या जनरल बॉडीची पूर्वपरवानगी अवश्यक असते.