सोसायटी स्थापन झाल्यापासूनच सोसायटीत राहणारे सर्व सभासद एकत्र रक्कम जमा करून मेन्टेनन्सद्वारे मालमत्ता कर, पाणीपट्टी कर हे जागेच्या मूळ मालकाच्या नावानेच वर्षांनुवर्षे भरत असतात! परंतु काही थकबाकीदार मात्र सोसायटीत राहूनसुद्धा जाणूनबुजून सोसायटीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून वर्षांनुवर्षे सोसायटीचा मेन्टेनन्स भरत नाहीत. खोटय़ा तक्रारी सोसायटीविरुद्ध करून सोसायटीला बदनाम करतात! सोसायटीमार्फत पुरविलेल्या सुविधांचाही थकबाकीदार पुरेपूर फायदा घेतात. सोसायटीच्या कामात व्यत्यय आणून नवीन येणाऱ्या सभासदांना चिथावणी देऊन एकमेकांत मतभेद निर्माण करतात. सरकारी कार्यालयात इतर सभासदांनी तक्रारी सोसायटीमार्फत करूनसुद्धा थकबाकीदार सभासदांवर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही! त्यामुळे वर्षोनुवर्षे प्रामाणिकपणे मेन्टेनन्स भरणाऱ्या सभासदांनाच अधिक भरुदड सोसावा लागतो! याचा विचार करून आता पुढील काळात मेन्टेनन्स थकविणाऱ्यांच्या मालमत्ता सरकारतर्फे महानगरपालिकेच्या आयुक्तांनीच सक्तीने सील करणे ही काळाजी गरज आहे. जेणेकरून सोसायटींतील थकबाकीदार सभासदांवर चाप बसेल आणि सोसायटय़ा चांगल्या स्थितीत सुरक्षित राहू शकतील.

दीपक दत्तात्रय प्रधान, ठाणे (प.)