* मी एका दुकानाचा सहखरेदीदार आहे. माझे नाव त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या पहिल्या सहखरेदीदाराच्या संमतीने गृहनिर्माण संस्थेची निवडणूक लढवू शकतो का?

-मिलिंद आठवले.

Vendors throw vegetables, Protest against nmc, Nashik Municipal Corporation, Demand Space for Business, nashik news, vendors protest news, marathi news, protest in nashik,
नाशिक महापालिकेसमोर भाजीपाला फेकून आंदोलन – अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा निषेध
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
panvel marathi news, panvel dispute marathi news
पनवेल : शौचालयाला पाणी मागितल्याने गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाकडून महिलेला शिवीगाळ 
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

* आमच्या मते आपण पहिल्या सहखरेदीदाराच्या परवानगीने गृहनिर्माण संस्थेची निवडणूक लढवू शकाल. मात्र त्या अगोदर गृहनिर्माण संस्थेशी एकदा संपर्क साधून आपणाला अकार्यक्षम सदस्य वगैरे बनवलेले नाही ना याची खात्री करून घ्यावी.

*  उपनिबंधक कार्यालयातील कारभार मनमानी असतो. उपनिबंधक कार्यालय हे संस्थाच्या मार्गदर्शनासाठी आहे की त्रास देण्यासाठी असा प्रश्न पडतो. कित्येक वेळा उपनिबंधकाचा आदेश मान्य नसेल तर त्या विरुद्ध त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करता येते का? त्या विरुद्ध आपण सहकारी न्यायालयात दाद मागू शकतो का?

-प्रकाश गोडसे

*  आपल्या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. आपणाला जर एखाद्या उपनिबंधकानी दिलेला आदेश मान्य नसेल तर आपण निश्चितपणे त्यांच्या वकिलांकडे दाद मागू शकता. एवढेच नव्हे तर आपण सहकारी न्यायालयातदेखील दाद मागू शकता. पण हे सर्व करायचे असेल तर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा लागतो. खर्च करावा लागतो व मनस्तापदेखील भोगावा लागतो. दुर्दैवाने संस्थेचे म्हणणे कसे चुकीचे आहे याचा खुलासा उपनिबंधक देतच नाहीत.

* मी एका को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची सदस्य आहे. सदर सदनिका फक्त माझ्या एकटीच्याच नावावर आहे. आता मला माझ्या यजमानांना संस्थेमध्ये सहयोगी सदस्य करून घ्यायचे आहे. जेणेकरून त्यांना संस्थेच्या दैनंदिन कारभारात भाग घेता येईल. त्यासाठी मला काही अ‍ॅग्रीमेंट करावे लागेल का? अ‍ॅग्रीमेंट करावे लागत असल्यास त्यावर स्टँपडय़ुटी भरावी लागेल का? ते अ‍ॅग्रीमेंट रजिस्टर करावे लागेल का? त्यासाठी संस्थेचा जनरल बॉडीचा ठराव लागेल का?

-नीरा भाटे, कल्याण, ठाणे.

* आपणाला जर आपल्या यजमानाला सहयोगी सदस्य करायचे असेल तर आपण तसे करू शकता. त्यासाठी आपण विहित नमुन्यातील अर्ज आणि विहित शुल्क गृहनिर्माण संस्थेकडे जमा करावे व त्यांना आपण यजमानांना सहयोगी सदस्य बनण्याची विनंती करावी.

सहयोगी सदस्य बनवण्यासाठी कोणत्याही करारनाम्याची अ‍ॅग्रीमेंटची जरूर लागत नाही. त्यावर कोणत्याही प्रकारचे मुद्रांक शुल्क द्यावे लागत नाही. अथवा करारनामा रजिस्टरदेखील करावा लागत नाही. संस्थेने त्यांना सहयोगी सदस्य केल्यावर त्यांना संस्थेच्या दैनंदिन कारभारात भाग घेता येईल.