अनधिकृत बांधकामांमुळे होणारी सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी शासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा विशेष तपशील..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील बहुतांश शहरांत कोणालाही कसल्याही प्रकारचे बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी संबंधित पालिकेची रीतसर परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. अशी परवानगी देताना संबंधित पालिका अनेक गोष्टी व कागदपत्रे पडताळून पाहते आणि मगच सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर बांधकाम सुरू करण्याची रीतसर परवानगी देण्यात येते. विकासकाने मंजूर नकाशाप्रमाणे व स्थापत्यशास्त्राच्या नियमानुसारच बांधकाम झाल्याची व प्रचलित नियम आणि अटी यांची पूर्तता केली असल्याची खात्री केल्यावरच पूर्णत्वाचा दाखला व भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येते. परंतु जेथे कोणतेही नियम न पाळता, कोणतीही परवानगी न घेता संपूर्णपणे बेकायदा बांधकाम केले जाते अशी बांधकामे कायदेशीर करण्याची मागणी मूळ धरू लागली आणि मग काही रक्कम दंड भरून ती नियमित करण्याची एक नवी प्रथा सुरू झाली आहे. अशा पद्धतीने राज्यातील पालिका हद्दीमध्ये बेकायदा बांधकामे सर्रास कायदेशीर होऊ  लागली. या प्रक्रियेत विकासक मालामाल होत आहेत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unauthorized construction and measures
First published on: 29-04-2017 at 02:54 IST