18 October 2019

News Flash

डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाचे छापे


पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेवर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. पिंपरीतील डी. वाय. पाटील दंतवैद्यकीय महाविद्यालयासह एकूण चार ठिकाणी आणि कोल्हापूरमध्ये छापा टाकण्यात आला आहे. या कार्यालयांबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणालाही या ठिकाणी प्रवेश देण्यात येत नाही.

आणखी काही व्हिडिओ