News Flash

महाराष्ट्रातील गोष्टींचा फायदा इथल्या लोकांना झाला पाहिजे- राज ठाकरे


महाराष्ट्रातील गोष्टींचा फायदा इथल्या लोकांना झाला पाहिजे. राज्यातील रोजगार आणि वाहन परवान्यांचे वाटप करताना मराठी लोकांना प्राधान्य मिळाले पाहिजे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एक ना अनेक मुद्दे उपस्थित करत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठीचा राग आळवला. राज ठाकरे आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्यांची माहिती राज यांनी पत्रकारपरिषदेत दिली. महाराष्ट्रातील गोष्टींचा फायदा इथल्या लोकांना झाला पाहिजे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X