एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा करणारे पुणे पोलीस दलातील पोलीस दाम्पत्य तारकेश्वरी आणि दिनेश राठोड यांच्यावर नेपाळ सरकारने नेपाळमध्ये प्रवेश करण्यास १० वर्षांची बंदी घातली आहे. या निर्णयाची प्रत नेपाळ पोलिसांनी पुणे पोलिसांना पाठवल्याचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. नेपाळ सरकारच्या निर्णयाने राठोड दाम्पत्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले नव्हते यावर शिक्कामोर्तब झाले […]