जगभरात नावाजली गेलेली अभिनेत्री अशी दीपिका पदुकोणची ओळख आहे. ‘ट्रिपल एक्स’ या हॉलिवूडपटामुळे तिच्या चेहऱ्याला जागतिक ओळख मिळाली. या सिनेमात ती विन डिझेलसोबत दिसली होती. करिअरच्या निमित्ताने दीपिका सातासमुद्रापार जरी गेली तरी ती आपले मूळ विसरली नाही याचा प्रत्यय नुकताच आला. दीपिका सोमवारी ऋषिकेशला देवदर्शनाला गेली असता तिथे तिने भक्तीभावाने आरती केली. ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील या अभिनेत्रीने सामान्य कपड्यांनाच प्राधान्य दिलं. आरती करताना तिच्या चेहऱ्यावरचे भक्तीभाव स्पष्ट दिसत होते. अनेक भारतीयांचे ऋषिकेशला जाऊन गंगा नदीचं दर्शन घेणं आणि आरती करणं हे स्वप्न असतं. दीपिकाने आपल्या कामाच्या वेळापत्रकातून वेळ काढून आईसोबत देवदर्शन केले.