करोनाच्या संकटकाळात सर्वात पुढे राहून लढा देणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती भारतीय हवाई दलानं कृतज्ञता व्यक्त केली आहे. हरयाणातील पंचकुला येथील सरकारी रुग्णालयावरुन हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनं फ्लायपास्ट केला. तर लष्कराच्या बँडनं या रुग्णालयाबाहेर वादन करीत मानवंदना दिली.