करोना लॉकडाउनमुळे आतापर्यंत बंद असलेले, पुण्यातील एपीएमसी मार्केट आज 50 दिवसानंतर पुन्हा सुरू झाले. या ठिकाणी आज राज्यभरातील विविध ठिकाणाहून 200 वाहनं फळ, भाज्या घेवून आले होते. जवळपास 400 पेक्षा अधिक वाहनं येणे अपेक्षित होते, परंतु मार्केट सुरू होण्याचा पहिला दिवस असल्याने वाहनं कमी आल्याचे दिसून आले.