Fadnavis on Maratha Reservation: ‘काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही’; फडणवीसांचे विधान
मराठा आरक्षणाचा तिढा निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा १४ वा दिवस असून त्यांची प्रकृतीही खालावली आहे. मराठा आरक्षणाचा तिढा मार्गी लावण्यासाठी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक सायंकाळी बोलावली आहे. या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा होणार? याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी दिली.