Candle March at Mumbai Press Club: न्यूजक्लिकवर कारवाई; मुंबईत पत्रकारांनी काढला कँडेल मार्च
दिल्ली पोलिसांनी मंगळवारी (३ ऑक्टोबर) न्यूजक्लिक’ वृत्त संकेतस्थळाशी संबंधित पत्रकारांवर ३० ठिकाणी छापेमारी करत त्यांची चौकशी केली. त्यानंतर न्यूजक्लिकचे दिल्लीतील कार्यालय सील केलं. कंपनीचे संस्थापक व मु्ख्य संपादक प्रबीर पूरकायस्थ यांना देखील अटक करण्यात आली. या विरोधात गुरुवारी (५ ऑक्टोबर) मुंबई पत्रकार संघ येथे कँडेल मार्च मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला जेष्ठ पत्रकार आणि पत्रकारिता करणारे विद्यार्थी उपस्थित होते. मोर्चादरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्या.