ससून रुग्णालयामधून अमली पदार्थ तस्कर आरोपी ललित पाटील हा पळून गेल्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून सात नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीये. पुणे पोलिसांनी ललित पाटील आणि टोळीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार मोक्का कारवाई केलीये, पण ललित पाटील याला ससून रुग्णालयात अनेक गोष्टींसाठी मदत करणारे ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना सह आरोपी म्हणून मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली.