पीटीआय, मुंबई

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताने दोन मनगटी फिरकीपटूंची संघात निवड करण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी अष्टपैलू इरफान पठाणने व्यक्त केले. भारताने धावा रोखण्यापेक्षा बळी मिळवून देणाऱ्या गोलंदाजांना प्राधान्य दिले पाहिजे, असेही पठाण म्हणाला.

Smriti Mandhana lead Team India Against Nepal match
INDW vs NEPW : श्रीलंकेत अचानक बदलला टीम इंडियाचा कर्णधार, जाणून घ्या काय आहे कारण?
Suryakumar Yadav likely to get captaincy till 2026 World Cup sport news
सूर्यकुमारकडे ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व? २०२६ विश्वचषक स्पर्धेपर्यंत कर्णधारपद मिळण्याची शक्यता
loksatta analysis gautam gambhir s appointment as head coach of team india even though he has no experience
रोखठोक, स्पष्टवक्ता गौतम गंभीर भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणार? प्रशिक्षकपदाचा अनुभव नसतानाही नियुक्तीमागे काय कारणे?
Sanath Jayasuriya, sri lanka head coach
श्रीलंकेच्या संघाला सावरणार ‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू, भारताविरूद्धच्या मालिकेपासून स्वीकारणार हेड कोचचा पदभार
Rahul Dravid said Rohit Sharma stopped him from resigning after the ODI World Cup sport news
एकदिवसीय विश्वचषकानंतर रोहितने पद सोडण्यापासून रोखले – द्रविड
BCCI Made Changes in India Squad for 2 IND vs ZIM Series
झिम्बाब्वेविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल, अचानक ३ नवे खेळाडू संघात दाखल; काय आहे नेमकं कारण?
Why Rohit Sharma Retired from T20I
Rohit Sharma : “मला T20I क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची नव्हती पण…”, हिटमॅनचा VIDEO होतोय व्हायरल
Arshdeep Singh Trolled By Navjot Singh Sidhu
“Confidence 100, Skill 0”, विश्वचषकात १५ विकेट घेतलेल्या भारतीय गोलंदाजाचा ‘तो’ Video शेअर करत नवज्योत सिंग सिद्धूने काढला चिमटा

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी प्राथमिक १५ सदस्यीय संघाची निवड करण्याची अंतिम मुदत १ मेपर्यंतची आहे. त्यामुळे २ जूनपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताला येत्या एक-दोन दिवसांत आपल्या संघाची घोषणा करावी लागणार आहे.

‘‘तुम्ही सर्वोत्तम पाच गोलंदाज निवडले पाहिजेत. रवींद्र जडेजा अष्टपैलू म्हणून आठव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. मात्र, माझ्या मते भारताने दोन मनगटी फिरकीपटूंची निवड करावी. भारताने लेग-स्पिनर रवी बिश्नोई आणि चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव यांना अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान दिले पाहिजे. बिश्नोईला जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा त्याने छाप पाडली आहे,’’ असे पठाण म्हणाला.

हेही वाचा >>>CSK vs SRH : गायकवाड, देशपांडे चमकले; चेन्नईची हैदराबादवर सहज मात

भारताकडे अनुभवी लेग-स्पिनर यजुवेंद्र चहलचाही पर्याय आहे. चहलने ‘आयपीएल’मध्ये राजस्थान रॉयल्सकडून अप्रतिम कामगिरी केली आहे. मात्र, भारताने चहलला निवडणे टाळले पाहिजे असे पठाणला वाटते. ‘‘गोलंदाज म्हणून चहलच्या गुणवत्तेबाबत शंका नाही. ‘आयपीएल’मधील कामगिरीमुळे त्याची भारतीय संघात निवड झाली पाहिजे असा मतप्रवाह आहे. मात्र, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणही खूप महत्त्वाचे ठरते हे आपण विसरता कामा नये. यात चहल मागे पडतो,’’ असे मत पठाणने मांडले.

तसेच गोलंदाजांमध्ये केवळ जसप्रीत बुमराचे स्थान पक्के मानले जाऊ शकते असे पठाणला वाटते. ‘‘बुमराची तुम्ही डोळे बंद करून निवड करू शकता. मात्र, अंतिम ११ खेळाडूंमध्ये बुमराव्यतिरिक्त तुम्हाला आणखी दोन वेगवान गोलंदाज निवडावे लागणार आहेत. वेगवान गोलंदाजांची निवड हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. बुमरासह मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळणे अपेक्षित आहे. या दोघांबाबतही बरेच प्रश्न आहेत. मात्र, भारताकडे सध्या अन्य फारसे पर्याय उपलब्ध नसल्याचा सिराज आणि अर्शदीपला फायदा होऊ शकेल,’’ असे पठाण म्हणाला.