सरकार आणि अदानीला जाब विचारण्यासाठी येत्या १६ डिसेंबरला शिवसेनेचा प्रचंड मोर्चा धारावी ते अदानी कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (५ डिसेंबर) या संदर्भात घोषणा केली. दक्षिण मुंबईतील नरीमन पॉईंट येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवालय या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.