महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेसन आजपासून (७ डिसेंबर) नारपुरमध्ये सुरू होत आहे. पुढील दहा दिवस अधिवेशन सुरू राहणार आहे. दरम्यान अधिवेशनाच्या आधीच विधानभवन परिसरात विरोधकांनी पोस्टरबाजी करत सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. तसंच अधिवेशनाला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या उपस्थितीवर वाद निर्माण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर पत्राद्वारे भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे सभागृहात हा विषय आजही तापण्याची चिन्हं आहेत.