Uddhav Thackeray in Nagpur: प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळांवर ठाकरेंचा बोचरा बाण
उद्धव ठाकरे यांनी आजही (१२ डिसेंबर) अधिवेशनात उपस्थिती लावली होती. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. नवाब मलिक यांच्या उपस्थितीवरून सभागृहात गदारोळ झाला होता. मात्र हीच भूमिका प्रफुल्ल पटेलांच्याबाबत भाजपा घेताना दिसत नाही. त्यावरून उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.