राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (२४ डिसेंबर) बारामती येथे बोलत असताना शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्याविरोधात केलेल्या बंडाची आठवण सांगितली. शरद पवार यांनी वयाच्या ३८व्या वर्षी बंड केलं. आम्हाला त्यासाठी ६० वर्ष थांबावं लागलं, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर शरद पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.