पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाचे भाजपाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मतदार संघातील गोखलेनगर भागात ६० लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी तीन वाजता केले जाणार होते. त्यापूर्वीच आमदार रविंद्र धंगेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांसह पाण्याच्या टाकीचे उदघाटन केले. यावेळी पोलीस अधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादाचा प्रकार देखील घडला आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचे वार्तांकन करण्यास येणार्या पत्रकारांना आतमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले होते. त्यावरून देखील पत्रकार आणि पोलीस अधिकार्यांसोबत वादाचा प्रकार घडला.