मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. तसंच आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीवर ते ठाम आहेत. सगे सोयरेंच्या अध्यादेशाची अमलबजावणी झाली नाही तर आम्ही २१ तारखेला आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.