सध्या काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार असून हा याबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे. “राहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ तारखेला गुजरातनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक आणि आपल्या या मार्गाने जे वाडा मार्गाने ते आपल्याकडे येते आहे. १६ तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामातच १६ तारखेला ते संवाद साधतील” असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.