Sanjay Raut on PM Modi: मोदींच्या “मेरा देश, मेरा परिवार” या घोषणेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल!
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीये. “२०१९मध्ये ‘मी चौकीदार’, आता काय तर ‘मेरा परिवार’. या देशातल्या १४० कोटी जनतेचा परिवार कोणत्या हालअपेष्टा भोगतोय हे मोदींना माहिती आहे. कालच आम्ही त्यांना विचारलं की तुमच्या परिवारात मणिपूर येत नाही का? मणिपूर जळतंय, तिथे महिलांची नग्न धिंड काढली जाते, लोकांना रस्त्यावर मारलं जातंय. हा मणिपूर मोदींच्या परिवारात येत नाही?” असा सवालही राऊतांनी विचारलाय.