सोमवारी (१३ मे) दुपारी तीन वाजल्यापासून मुंबईमध्ये धुळीचे वादळ आणि मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. याच दरम्यान घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरमध्ये एक भलंमोठं होर्डिंग कोसळलं. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली असून आकडा
१४ वर गेला आहे. तसंच ७४ जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या सर्व दुर्घटनेचा थरारक अनुभव प्रत्यक्षदर्शीने सांगितला आहे.