Aaditya Thackeray On Sanjay Gupta : एकीकडे मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना अनेक नेते शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करतायत तर आता दुसरीकडे तोतया प्रवक्त्यांमुळे पुन्हा शिवसेनेची डोकेदुखी वाढताना दिसतेय. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ‘संजय गुप्ता’ यांच्यावर हे पक्षाशी काही संबंध नसताना टीव्ही चॅनल्सवर जाऊन पक्षाची बाजू मांडल्याचा आरोप केला आहे. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी देखील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून संजय गुप्ता हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ह्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ता नाहीत. त्यांनी मांडलेली मते ही पक्षाची मते नव्हेत. माध्यमांनी ह्याची नोंद घ्यावी, अशी माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली होती. आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, प्रियांका चतुर्वेदींसह नेत्यांचा रोष ओढावून घेणाऱ्या या ‘संजय’ यांचा विषय सविस्तर समजून घेऊया.