जम्मू काश्मीर येथील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलही काही नागरिकांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात डोंबिवलीतील तीन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले अशा तीन जणांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हे तिघंही डोंबिवलीचे रहिवासी होते.