काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित आणल्याबद्दल डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे बॅनर झळकले आहेत. मात्र या बॅनरबाजीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार वाद उफाळला आहे. ठाकरे गटाने बॅनरबाजीवर टीका केली असून शिंदे गटाने कामाच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं सांगितलं. दरम्यान, पहलगामधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीत तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.