सायन कोळीवाडा येथील पाच तरुण खारघर येथील गोल्फ कोर्सच्या मागील डोंगरावर फिरायला गेले होते. मात्र, अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह वाढल्याने हे तरुण डोंगरात अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच खारघर अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोरीच्या साहाय्याने सर्व पाच तरुणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात अग्निशमन जवानांना यश आलं.