03 August 2020

News Flash

बेकायदा सरकार बरखास्त करा

नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बेकायदा, घटनाबाह्य़ असून ८ नोव्हेंबरपासून ते बेकायदाशीररीत्या चालवले जात आहे,

| November 13, 2014 06:39 am

नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बेकायदा, घटनाबाह्य़ असून ८ नोव्हेंबरपासून ते बेकायदाशीररीत्या चालवले जात आहे, असा आरोप करीत राज्यपालांनी ते बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करावी, अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाने उच्च न्यायालयात केली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. २० सप्टेंबरच्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार विधानसभा बरखास्त झाल्यानंतर नवे सरकार स्थापन करण्यासाठी घालून दिलेल्या कालावधीत फडणवीस सरकार स्थापन झालेले नाही, असा दावा करीत सरकार बरखास्तीची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. जयराम पवार यांनी अॅड्. प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत केलेली ही याचिका न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2014 6:39 am

Web Title: bharipa demands withdrawal illegal govt
Next Stories
1 भ्रष्टाचारमुक्त कारभाराची राज्यपालांची ग्वाही
2 भाजपवर विश्वास, नैतिकतेचे पानिपत
3 राज्यपालांना धक्काबुक्की, ५ काँग्रेस आमदार निलंबित
Just Now!
X