News Flash

सोनियांच्या सभेसाठी आणलेल्या महिलांना ‘हात’ दाखवून ‘ठेंगा’

मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे रोकड सापडण्याचे प्रकार समोर येत असताना आता प्रचारासाठी माणसं भाड्याने आणल्याचेही उघडकीस आले आहे.

| October 12, 2014 11:28 am

मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे रोकड सापडण्याचे प्रकार समोर येत असताना आता प्रचारासाठी माणसं भाड्याने आणल्याचेही उघडकीस आले आहे.
गोंदियामध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक महिलेला १०० रु. चे आमिष देऊन बोलवण्यात आले होते. मात्र, पैसे देण्याच्या वेळी ‘ठेंगा’ दाखवण्यात आल्याने संतप्त झालेल्या तब्बल तीन हजार महिलांनी काँग्रेसच्या गडचिरोली विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार सगुना तलांडी यांच्या प्रचार कार्यालयासमोरच ठीय्या आंदोलन सुरू केले आहे.  तलांडी यांनीच या महिलांना पैसे देऊन प्रचारासाठी आणल्याचे समजते. या महिलांचा जमाव पाहून कार्यालयातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पळ काढला असून या सर्व प्रकारामुळे काँग्रेसच्या सगुना तलांडी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 11:28 am

Web Title: congress candidate given money to rally supporters
टॅग : Congress
Next Stories
1 .. काय असणार ‘ती’ घोषणा?
2 दिल्लीश्वरांपुढे झुकणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रात नको- उध्दव ठाकरे
3 गुजरातहून ‘फौजा’!
Just Now!
X