उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या प्रचारात प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे.
मैनपुरी आणि इटावा जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी उमेश सिन्हा यांनी वरील माहिती दिली. भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध सपाने केलेल्या तक्रारीबाबत विचारले असता सिन्हा म्हणाले की, आदित्यनाथ यांनी प्रक्षोभक भाषण केल्याबाबतचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही.
अहवाल प्राप्त झाला असून आदित्यनाथ यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचे त्यामध्ये म्हटलेले नाही.