बहुमताच्या जोरावर केंद्रात सत्ता स्थापन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील ‘गॉसिपिंग’ला ट्विटरवरून मसाल्याचा तडका दिला जात आहे. सत्ताधारी भाजपच नव्हे तर प्रमुख विरोधी lok01पक्ष काँग्रेस, उच्चपदस्थ नोकरशाहीमधील गावगप्पांची चर्चा ट्विटरवरील ‘ल्यूटन्स मसाला व ल्यूटन्स स्पाईस’ या अकांटवर रोज रंगते आहे. ल्यूटन्स मसाला व ल्यूटन्स स्पाईसचे अनेक पाठलागकर्ते (फॉलोअर्स) आहेत. विशेष म्हणजे ल्यूटन्स स्पाईसने ३१ ऑक्टोबर रोजी केलेल्या एका ट्विटला खुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेवरेट केले आहे.
ल्यूटन्स स्पाईसवरून काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान सुरू असलेल्या शीतयुद्धाचे ट्विट करण्यात आले होते. ज्यात म्हणे राजनाथ सिंह यांच्या सहकाऱ्याने मोदी करीत असलेल्या अरेरावीची माहिती काही पत्रकारांना दिल्लीच्या अतिमहागडय़ा खान मार्केटमधील एका रेस्टॉरंटमध्ये दिली.
ल्यूटन्स स्पाईसवरील एका ट्विटमध्ये आम आदमी पक्ष व काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या पडद्यामागील चर्चेला खास दिल्ली स्टाईल तडका दिला होता.  केजरीवाल यांचे नाव न घेता केवळ मफरलचा उल्लेख आहे- ‘किसी भी हालत मे मफलर को सीएम बनाआ’     
*ल्यूटन्स स्पाईसवर महाराष्ट्र काँग्रेसमधील घडामोडींचा उल्लेख आहे. ‘तामिळनाडूतील जी. के. वासन यांनी बंडखोरी करून काँग्रेसला जोरदार धक्का दिला. काही दिवस थांबा महाराष्ट्रातही असेच बॉम्बस्फोट होतील. विशेष म्हणजे ते १०, जनपथला रोखता येणार नाहीत.
*सगळ्यात मोठा कहर म्हणजे महाराष्ट्रातील गावगप्पांनाही ट्विटरवर उधाण आले आहे. ल्यूनस्ट स्पाईसवरील ते ट्विट असे – ‘भाजपमधील असंतूष्टांनी ‘हे  तर सौ. फडणवीसांचे सरकार आहे’, असे म्हणण्यास सुरूवात केली आहे.    ’