विधानसभा अध्यक्षपदासाठी हरिभाऊ बागडे आणि हरिभाऊ जावळे यांच्या नावावर भाजप विचार करीत असून बागडे यांची निवड होण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. हरिभाऊ बागडे हे फुलंब्री येथील आमदार असून ते सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आहेत. तर हरिभाऊ जावळे हे रावेरचे आमदार आहेत. अल्पमतातील सरकार चालविण्यासाठी अध्यक्षांना कसब पणाला लावावे लागेल. त्याचा विचार करुनच उमेदवार भाजप ठरविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.