News Flash

सुधारणांच्या अंमलबजावणीची जबाबदारी बक्षी समितीवर

राज्यातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या माधवराव चितळे समितीने सुचविलेल्या ४२ सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी अप्पर मुख्य सचिव (नियोजन) के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती

| September 4, 2014 04:22 am

राज्यातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या माधवराव चितळे समितीने सुचविलेल्या ४२ सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी अप्पर मुख्य सचिव (नियोजन) के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत वित्त, महसूल, कृषी व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, जलसंपदा-लाभ क्षेत्र विकास विभागाचे प्रधान सचिव, जलसंधारण व रोहयो विभागाचे प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, वने, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव, महासंचालक महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 4:22 am

Web Title: maharashtra irrigation scam madhav chitale panel bakshi commision
Next Stories
1 कोल्हे यांचा राष्ट्रवादीला रामराम?
2 निवडणुकांतील काळ्या पैशाच्या तपासासाठी विशेष पथक
3 निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्रांबाबत संभ्रम
Just Now!
X